आगरी पद्धतीचे सुके मटण |सुक्या मटणाची कृती

आगरी पद्धतीचे ' सुके मटण
आमच्याकडे पारंपारिक बनविले जाणाऱ्यासुक्या मटणाची कृती खालीदेत आहे. मीपहिल्यांदाच स्वतः लिहिण्याचा प्रयत्नकरत आहे. तरीलेखन शैलीत काहीत्रुटी असल्यास कृपया समजुनघेणे.
सहीत्य :- किलोमटण
मोठा कांदा(बारीक कापलेला)
१२-१५ लसूणपाकळ्या आणि दीडइंच आल्याचा तुकडा(एकत्र पेस्ट करून)
टि. स्पूनहींग
टे. स्पूनहळद
टे. स्पूनगरम मसाला
- टे. स्पून लाल तिखटमसाला ( तुमच्याकडील मसाल्याच्या तिखटपणानुसारकमी-जास्त करूशकता )
टे. स्पूनडालडा
मिठ चवीनुसार
तेल साधारण ७० ते८० ग्रॅम
अर्धी वाटी बारीककापलेली कोथिंबीर
मसाला : सुके खोबरे मोठी वाटी(साधारण १०० ग्रॅम), पातळ कापून ( चिवड्यामध्येटाकण्यासाठी कापतो तसे )
मोठे तुकडेदालचिनी
- लवंग
- काळेमिरे
स्टार बडीशेपच्या (Star Anise) -पाकळ्या
टी. स्पूनखसखस
टे. स्पूनबडीशेप
- टे. स्पून धणे
- वेलदोडे
-१० लसूणपाकळ्या
दिड इंच आलं
वरील सर्व जिन्नसवेगवेगळे भाजून थंड झाल्यावरमिक्सरवर शक्यतो सुकेच बारीककरून घेणे (फारबारीक करू नये. थोडे खरबरीतच ठेवणे).
कृती :- सर्वप्रथम मटण स्वच्छधुवून घेणे. फोडणीसाठीपालेल्यात तेल टाकूनत्यात कांदा परतूनघेणे. कांदा लालसरहोत आला कित्यात हिंग आणिआले लसूण पेस्टटाकावी. दोन मिनिटेपरतल्यावर त्यात हळद आणिगरम मसाला टाकावाआणि अजून मिनिट परतावे आणित्यात मटणाचे तुकडेटाकावे. पातेल्यावर झाकण ठेवूनत्यावर थंड पाणीठेवावे. ग्यास मध्यम ठेवावा. अधेमधे झाकण काढूनढवळावे. तसेच वरचेपाणी गरम झाल्यारते फेकून दुसरेथंड पाणी झाकणावरठेवणे. १० मिनटेवाफेवरच शिजू द्यावे. नंतर त्यात अर्धीकोथिंबीर, मीठ ,लालतिखट आणि डालडाटाकून गरजेनुसार गरमपाणी टाकून शिजवूनघेणे. पूर्ण शिजतआल्यावर आपला तयारअसलेला मसाला टाकून - मिनिटेशिजवून घ्यावे. वरून कोथिंबीरटाकावी आणि तांदळाच्याभाकरीसोबत खायला घ्यावे. (फारसुके किंवा फारपातळ ठेवू नये, मध्यम ठेवावे कारणथंड झाल्यावर थोडेघट्ट होते)
टीप : . चुलीवरशिजवायला मिळाले तर अजूनचछान. . तुम्हालकुकरमध्ये शिजवायचे असेल तर, तिखट वगैरे सर्वटाकून झाल्यावर तुमच्याअंदाजानुसार पाणी आणितुम्ही वापरत असलेल्या कुकरनुसार शिट्ट्या घेवूननंतर आपला तयारमसाला घालून पुढीलकृती वरील प्रमाणेचकरावी. . तुम्हीमटणाऐवजी चिकनसुद्धा वापरून शकता.





Comments