लोकसेवा स्पर्धा परीक्षेत सर्वातमोठी भीती मुलाखतीचीअसते. लेखी परीक्षाबरीच मुले पासहोतात. आता सबंधराज्यभर कोचिंग क्लासेस आहेत. तेथे लेखी परीक्षेचेप्रशिक्षण दिले जाते. मात्र मुलाखत हाएक वेगळा अनुभवआहे.
इंग्रजीत आपण पेपरलिहितो; परंतु बोलायची वेळआल्यावर गडबडतो. त्याचे कारणआपल्याला रोज सातत्यानेइंग्रजी बोलायची सवय नसते. कॉनव्हेंन्टमधील मुले फाडफाडइंग्रजी बोलतात. त्याचा प्रचंडन्यूनगंड आपल्या मनात बसतो. आपल्याला इंग्रजीत विचार करतायेत नाही. आपणमराठीत किंवा आपल्या भाषेतचविचार करतो. मगतो इंग्रजीमध्ये भाषांतरीतकरतो. यामध्ये वेळजातो. नेमका शब्दन सापडल्यास फजितीहोते. मुलाखतीच्यावेळी आपलीदेहबोली समोरच्याला हे स्पष्टजाणवून देते कीआपण घाबरलो आहोत. अशाने आपले मूल्यमापनकरताना परीक्षक लक्षात ठेवतोकी आपल्याजवळ OLQ (officer like qualities) नाहीत. मग थोडक्यातआपली संधी हुकते.
या सर्वांवर उपाय काय? घरी इंग्रजी बोललेजात नाही, किंवाज्यांच्याकडे इंग्रजी बोलण्याचा सरावकरण्याचे साधन नाहीअशा मुलांना मुलाखतीचीभीती जास्त वाटते. मीही या दिव्यातूनगेले आहे. त्यावेळीमहाराष्ट्रात आठवीपासून इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे इंग्रजी बोलण्याची भीतीवाटायची. मी नववीतअसताना दिल्लीला गेले. तेथेमाझी बोर्डाची परीक्षा झाली. मीसंस्कृतमध्ये बोर्डात प्रथम आले. त्यामुळे मी कॉलेजचीअॅडमिशन घ्यायला गेले की, संस्कृत घेऊन बी.ए. कर, असे मला सागितलेजायचे. संस्कृत घेऊन मीकॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली असतीतर काही बिघडलेनसते. परंतु ज्ञानाचीकवाडे उघडायची असतील, आणि जागतिक पातळीवरस्पर्धा करायची असेल तरइंग्रजी भाषेला पर्याय नाही. मग आपणच तीभाषा आत्मसात काकरु नये ? त्यामुळेपहिली गोष्ट हीहोईल की माझ्यामनातली इंग्रजीची भीती निघूनजाईल. माझा न्यूनगंडनाहीसा होईल.
मी इंग्रजी विषय घेऊनबी.ए. झाले. मग पुन्हा इंग्रजीघेऊन एम.ए. झाले. इंग्रजी बोलतायावे यासाठी आधीघरातल्या घरात भावंडांशी, आई वडीलांशी इंग्रजीबोलायला सुरुवात केली. कॉलेजमध्येहीकटाक्षाने मैत्रिणींशी इंग्रजीत बोलायचाचंग उचलला. त्याच्याजोडीला रोज इंग्रजीवर्तमानपत्रातून आठ तेदहा ओळी निवडूनत्या मोठयाने वाचायलासुरुवात केली. मग त्याओळींचा अर्थ सोप्याभाषेत पण इंग्रजीतवडिलांना सांगायला सुरुवात केली. जनरल नॉलेज वाढविण्यासाठीकाही मासिके, काहीपुस्तके वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला फार जडगेले. सारखे मराठीशब्दच तोंडात येत. त्यामुळे इंग्रजीत विचार करायचीसवय लावून घेतली. आता प्रश्न होताउच्चारांचा. त्यासाठी डिक्शनरीचा आधारघेतला. थेसॉरसही अश्यावेळी फारउपयोगी पडला. इंग्रजी बोलतानासारखे आपण ‘दुसरी’ भाषा बोलतो आहोत, याची जाणीव व्हायची. त्यामुळे एक प्रकारचाअवघडलेपणा यायचा. त्यासाठी आरशासमोरबोलण्याचा सराव केला.
मनातील दुसरा शत्रू मुलाखतीबद्दलचीभीती. प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षातिथले वातावरण, अपरिचीत वास्तूयामुळे आपल्या मनात धडकीभरते. मुलाखत घेणारीमाणसे आपल्याला येणारेचप्रश्न विचारतील, की भलतेचकाही, अशी धास्तीवाटत असते. यासाठीशक्यतो ज्या ठिकाणीआपली मुलाखत आहे, ती जागा आधीपाहून ठेवावी. मुलाखतघेणारे कुठे बसणार, आपण कुठून प्रवेशकरणार, आपली बसायचीजागा कुठली, याचापूर्ण अभ्यास करावा. आपली मुलाखत कोणघेणार आहेत, त्यांचीपार्श्वभूमी काय आहेहे शोधायचा प्रयत्नकरावा. ती माणसेज्या विषयात तज्ज्ञआहेत त्याला धरूनप्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम अपरिचितविषयावर प्रश्न समोर येऊनआपली फजिती होतनाही.
मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचेउत्तर आपल्याला माहीतअसेलच असे नाही. अशावेळी बतावणी करून वेळमारुन नेणे अगदीचुकीचे. उत्तर माहीत नाही, असे प्रांजळपणे कबूलकरणे योग्य. काहीप्रश्न गुगलीसारखे असतात, काहीराजकारणाशी निगडित असतात. अश्यावेळी‘हे माझे मतआहे’ असे स्पष्टकरावे. त्याने समोरचा माणूसदुखावत नाही.
एखाद्या मुलाखतकाराच्या बोलण्याने वाईट वाटलेतरी ते चेहऱ्यावरदाखवू नये. अनेकदाप्रश्नकर्ता आक्रमक होतो, वाएखाद्या गोष्टीचा कीस काढतबसतो. या मागचीभूमिका तुमचा संयम जोखण्याचीअसते. आपण अशावेळीरागावलो, उद्दीप्त झालो किंवासंयम सोडला तरहानी आपलीच होते. हे सगळे आपलीपरीक्षा घेण्यासाठीच आपल्याला मुद्दामडिवचत आहेत याचीजाणीव ठेवणे गरजेचेआहे.
चेहरा शांत आणिसंयमी असावा. भाषामृदू परंतु स्पष्टअसावी. आपली मतेठाम असावीत. आपल्यादेहबोलीत कुठेही उग्रपणा किंवाउद्दामपणा नसावा. मुलाखतीनंतर मुलाखतीचासारांश लिहायचा असतो. त्यासाठीमुलाखतीच्यावेळी विचारलेले प्रश्न आणिआपली उत्तरे लक्षातठेवण्याचा प्रयत्न करावा. झालेलीमुलाखत थोडक्यात पण प्रभावीपद्धतीने आपल्याला मांडता येतेका याची तीपरीक्षा असते.
थोडक्यात काय, तरमुलाखत ही आपल्याव्यक्तिमत्त्वाची, ज्ञानाची, प्रामाणिकपणाचीआणि आपल्या सच्चेपणाचीपरीक्षा असते. त्यामुळे आपणसहज-सुंदर राहावे.
अनेकांना असे वाटतेकी मुलाखतीसाठी विशेषकपडे घालणे आवश्यकआहे. त्याची खरेतर काहीच आवश्कतानसते. आपण छानकपडे घालून गेलोकी बघणाऱ्याला आपल्याकडेपाहून प्रसन्न वाटते. परंतु अनेकांना भारीकपडे घेणे परवडतनाही. त्यामुळे आपलेसाधेच कपडे व्यवस्थितघालून गेल्याने काहीहीनुकसान होत नाही. चेहऱ्यावरचा भाव महत्त्वाचा. चेहरा प्रसन्न आणिआत्मविश्वासाने परिपूर्ण हवा. फाजिलअभिमानही नको. थोडक्यात, आपण जसे आहोततसेच मुलाखतकारांसमोर सादरव्हावे. आपल्यातल्या प्रामाणिकपणाने आणिसाधेपणाने आपल्याला कोणालाही जिंकूनघेता येते.
Comments
Post a Comment