सकाळच्या हेडलाईन्स 8 वाजताच्या

सकाळच्या हेडलाईन्स 8 वाजताच्या 

---------------- 
1. रेल्वेचं तात्काळ तिकीट उद्यापासून महागणार, स्लीपरसाठी 200, थर्ड एसी 400, आणि सेकंड एसी साठी आता 500 रूपये मोजावे लागणार 
----------------------- 
2. सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे चार दिवस बँका बंद, ईद आणि ख्रिसमसमुळं सुट्ट्या जोडून आल्याने पर्यटनस्थळांवर गर्दी वाढण्यास सुरुवात
-------------------------
3. भाजप खासदार किर्ती आझाद यांचं पक्षातून निलंबन, डीडीसीए घोटाळ्यात अरुण जेटलींवर आरोप केल्यानं कारवाई
---------------------------
4. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, दोन्ही देशात अणू उर्जा आणि संरक्षणासंदर्भात विविध करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता
----------------------------
5. अखेर कोल्हापुरातून टोल हद्दपार, मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात घोषणा, करवीर नगरीत जल्लोष
-----------------------------
6. मुंबई लोकलमध्ये अंध मुलीची तरुणाकडून छेड, हद्दीच्या कारणामुळे रेल्वे पोलिसांचा तक्रार घेण्यास टाळाटाळ, आरोपी तरुण मोकाट
------------------------------
7. वाजिदच्या आयसिस कनेक्शनचा पुरावा नाही, पुणे पोलिसांचा खुलासा, चुकीच्या माहितीमुळं बदनामी झाल्याचा कुटुंबाचा आरोप
-------------------------------
8. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा पारा घसरलेला, निफाडचा पारा 5.6 अंशावर, उर्वरीत महाराष्ट्रातही थंडीची लाट

Comments