एका गांवात एकज्योतीषी आलेला असतो...👻👻
त्याच्याकडे एक महिला जाते...😇😇
तो ज्योतीषी म्हणतो उद्या येताना तुझ्या नव-याची कुंडली घेऊन ये..
ती घेऊन जाते...🔯🔯
ती पाहून तो सांगतो,
तुझ्या
नव-याचे नांव तुकाराम आहे..
ती म्हणते व्हय महाराज !!
तो पुढे सांगतो ,
तुझ्या सास-याचे नांव गेणू होतं
ती म्हणते व्हय महाराज..😳
तो पुढं सांगतो ..
तुला दोन मुलं आहेत ..😳😳
मुलगा थोरला अन्
धाकटी मुलगी आहे..
ती पुन्हा म्हणते व्हय महाराज..😱
तो पुढे सांगतो...
तुम्ही कालच घरी गहूं आणि तांदुळ आणलेत...
मग तर ती आवाक् होऊन
त्याच्या पायांवर लोटांगण घालते
म्हणते, महाराज आपण अंतरयामी आहात...💫💫
त्यावर तो तिला म्हणतो,
.
.
.
.
हे रेशन कार्ड घेऊन जा आणि उद्या येताना कुंडली घेऊन ये...
😄हसा😄मोठ्यााने
Comments
Post a Comment